Advertisement

मुदत संपलेले वाहन परवाने, आरसी बुकला मुदतवाढ

लॉकडाऊनदरम्यान वाहन परवाना आणि नोंदणी कागदपत्रांची मुदत संपत असली तरी ही कागदपत्रे ३० जूनपर्यंत वैध राहणार आहेत.

मुदत संपलेले वाहन परवाने, आरसी बुकला मुदतवाढ
SHARES

लॉकडाऊनदरम्यान वाहन परवाना आणि नोंदणी कागदपत्रांची मुदत संपत असली तरी ही कागदपत्रे ३० जूनपर्यंत वैध राहणार आहेत.  केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत विविध राज्यांना निर्देश जारी केले आहेत. लॉकडाऊनमुळे आरटीओ कार्यालय बंद असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना पाठवण्यात आलेल्या निर्देशात म्हटलं आहे की, मोटार वाहनांशी निगडीत सर्व फिटनेस, परमिट, वाहन परवाना, नोंदणीकरण आणि इतर दस्तावेज १ फेब्रुवारी २०२० किंवा त्यानंतर संपत असतील तर ते ३० जून २०२० पर्यंत वैध राहतील.

लॉकडाऊन आणि सरकारी परिवहन कार्यालये बंद असल्यामुळे विविध मोटार वाहनांच्या कागदपत्रांचे नुतनीकरण अडचणी येत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने व्यावसायिक परमिटवर टॅक्सी-बस सारखे वाहन चालवणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. परिवहन मंत्रालयाने राज्यांना म्हटले आहे की, लॉकडाऊन कालावधीत टॅक्सी, बस आदींची वाहतूक सुरु नाही. अशावेळी या परमिट धारकांना या कालावधीसाठी सूट देण्यात यावी. याला नॉन यूज क्लॉजची सुविधा म्हटले जाते. यासाठी एनआयसीला वाहन सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक त्या दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले आहे.



हेही वाचा

बिग बझार देणार होम डिलिव्हरी, 'हे' आहेत फोन क्रमांक

एसबीआय कर्मचाऱ्यांकडून १०० कोटींची मदत




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा