Advertisement

बिग बझार देणार होम डिलिव्हरी, 'हे' आहेत फोन क्रमांक

बिग बझार या सुपर मार्केटने होम डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

बिग बझार देणार  होम डिलिव्हरी, 'हे' आहेत फोन क्रमांक
SHARES

कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून संंपूर्ण भारता लाॅक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेकांनी जीवनावश्यक वस्तुंचा साठा करून घेतला आहे. मात्र तरीही अनेकांकडे जीवनावश्यक वस्तुंचा साठा नाही आहे. अनेकांकडे काही गरजेच्या वस्तूंचा साठा नाही. या परिस्थितीमध्ये अनेक दुकानांकडून होम डिलिव्हरीची सोय उपलब्ध करून दिली आहे. बिग बझार या सुपर मार्केटने देखील होम डिलिव्हरीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मुंबईतील विविध भागांमध्ये त्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बिग बझारने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी विले पार्ले, विरार, कांदिवली, वसई, गोरेगाव, ठाणे अशा मुंबईतील 16 भागांमध्ये बिग बझारकडून ही सुविधा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू किंवा गरजेच्या वस्तूंचा तुटवडा जरी भासला, तरी मुंबईकर बिग बझारमधून त्यांची ऑर्डर देऊ शकतात.

 आपल्या जवळच्या बिग बझार दुकानात फोन करा.. तुमची सामानाची यादी द्या आणि घरी सामान आलं की पैसे द्या.. अशा आशयाचे ट्विट बिग बझारकडून करण्यात आले आहे. तसेच, विभागनिहाय त्या त्या भागातील दुरध्वनी क्रमांकदेखील देण्यात आले आहेत. मात्र मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने सामान घरी येण्यास उशीर लागण्याची शक्यता असल्याचेही व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.हेही वाचा -

Coronavirus Updates: १४ एप्रिलपर्यंत लोकल बंद

Coronavirus Updates: प्रभादेवीत 'त्या' महिलेला करोनाची लागण
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement