Advertisement

१ जानेवारीपासून सर्व वाहनांवर Fastag बंधनकारक, नितीन गडकरी यांची घोषणा

देशात १ जानेवारीपासून सर्व वाहनांसाठी FASTAG बंधनकारक असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ही घोषणा केली.

१ जानेवारीपासून सर्व वाहनांवर Fastag बंधनकारक, नितीन गडकरी यांची घोषणा
SHARES

देशात १ जानेवारीपासून सर्व वाहनांसाठी FASTAG बंधनकारक असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी ही घोषणा केली.

टोलनाक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने २०१६ मध्ये FASTAG योजना आणली आहे. मात्र, FASTAG ची संख्या आणि देशात असलेल्या वाहनधारकांची संख्या पाहता दिलेल्या वेळेत सर्व वाहनांना FASTAG लावणे शक्य नव्हतं. त्यामुळे वाहनधारकांना काही दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता नवीन वर्षापासून मात्र प्रत्येक वाहनाला FASTAG असणं बंधनकारक असणार आहे.

FASTAGची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. याचा प्रवाशांनाच फायदा होणार आहे. प्रवाशांचा सुट्ट्या पैशांची डोकेदुखी थांबणार आहेच. शिवाय इंधन आणि वेळेचीही बचत होणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं.

काय आहे FASTAG संकल्पना?

FASTAG ही संकल्पना २०१६ पासून सुरू करण्यात आली. वाहनाच्या पुढील काचेवर FASTAG स्टिकर लावले जाते. याचे डिव्हाईस रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजीद्वारा वापर करते. ते थेट टोल नाक्यावरील स्कॅनरला कनेक्ट असते. त्यामुळे तुमच्या अकाऊंटमधील पैसे कापले जातात. फास्टॅग तुम्ही तुमच्या वॉलेट, डेबिट किंवा क्रेडिट कार्डशी जोडू शकता. 

फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा झाल्यानंतर संबंधित वाहन चालकाला त्या संबंधीचा एसएमएस त्यांच्या मोबाईलवर येईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे. फास्टॅगची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहेत.

NHAI आणि २२ वेगवेगळ्या बँकेतून फास्टॅग खरेदी करता येते. पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे. Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank कडूनही फास्टॅग दिलं जातं. जर फास्टॅग NHAI प्रीपेड वॉलेटशी कनेक्ट असेल तर चेकच्या माध्यमातून यूपीआय/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ NEFT/नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून रिचार्ज केलं जातं. जर बँक खात्याशी फास्टॅग लिंक असेल तर तुमच्या खात्यातून थेट पैसे कट होतील. जर Paytm वॉलेटला फास्टॅग कनेक्ट असेल तर त्यातून थेट रक्कम कापली जाते.

FASTAG साठी आवश्यक कागदपत्रे-

  • वाहनाचं नोंदणीचं पत्र
  • वाहनाच्या मालकाचा फोटो
  • KYCसाठी आवश्यक कागदपत्र
  • वास्तव्याचा दाखला

हेही वाचा -

मुंबईत आलेल्या 'त्या' प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम

मुंबई लोकलच्या दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा