Advertisement

FASTAG लावण्याची मुदत आणखी दीड महिन्यांनी वाढवली

१ जानेवारीपासून चारचाकी वाहनांनासाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं होतं. मात्र, वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे केंद्र सरकारने फास्टॅगची मुदत वाढवली आहे.

FASTAG लावण्याची मुदत आणखी दीड महिन्यांनी वाढवली
SHARES

फास्टॅग लावण्याबाबत आता केंद्र सरकारने वाहन चालकांना दिलासा दिला आहे. आता १५ फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येऊ शकतं. १ जानेवारीपासून चारचाकी वाहनांनासाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आलं होतं. मात्र, वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे केंद्र सरकारने फास्टॅगची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.

टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १ जानेवारी २०२१ पासून  राष्ट्रीय मार्गांवरील टोलनाके कॅशऐवजी फास्टॅग लेनमध्ये रुपांतरीत करण्याची घोषणा केली होती.  जर एखादा वाहनचालक फास्टॅगशिवाय टोलनाक्यावर आला तर त्याला दुप्पट टोल द्यावा द्यावा लागणार आहे. मात्र, आता फास्टॅग लावण्यासाठी वाहनचालकांना दीड महिन्यांची मुदत मिळाली आहे.

टोलनाक्यांवरील गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने २०१६ मध्ये FASTAG योजना आणली आहे. मात्र, FASTAG ची संख्या आणि देशात असलेल्या वाहनधारकांची संख्या पाहता दिलेल्या वेळेत सर्व वाहनांना FASTAG लावणे शक्य नव्हतं. त्यामुळे वाहनधारकांना काही दिवसांची मुदत देण्यात आली होती.  नवीन वर्षापासून मात्र प्रत्येक वाहनाला FASTAG असणं बंधनकारक केलं होतं. मात्र, आता पुन्हा FASTAG लावण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली आहे.  

FASTAG ची सक्ती केल्यानंतर वाहनांना टोलनाक्यांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. याचा प्रवाशांनाच फायदा होणार आहे. प्रवाशांचा सुट्ट्या पैशांची डोकेदुखी थांबणार आहेच. शिवाय इंधन आणि वेळेचीही बचत होणार आहे.  

२२ वेगवेगळ्या बँकेतून फास्टॅग खरेदी करता येते. पेटीएम, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफार्मवरही ते उपलब्ध आहे. Fino Payments Bank आणि Paytm Payments Bank कडूनही फास्टॅग दिलं जातं. जर फास्टॅग NHAI प्रीपेड वॉलेटशी कनेक्ट असेल तर चेकच्या माध्यमातून यूपीआय/ डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ NEFT/नेट बँकिंग आदींच्या माध्यमातून रिचार्ज केलं जातं. जर बँक खात्याशी फास्टॅग लिंक असेल तर तुमच्या खात्यातून थेट पैसे कट होतील. जर Paytm वॉलेटला फास्टॅग कनेक्ट असेल तर त्यातून थेट रक्कम कापली जाते.

FASTAG साठी आवश्यक कागदपत्रे

- वाहनाचं नोंदणीचं पत्र

- वाहनाच्या मालकाचा फोटो

- KYCसाठी आवश्यक कागदपत्र

- वास्तव्याचा दाखला



हेही वाचा -

जानेवारी ते नोव्हेंबर २०२० पर्यंत रेल्वेच्या हद्दीत ३५ हजार गुन्ह्यांची नोंद

सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन क्षमतेत वाढ



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा