गुड न्यूज... पेट्रोल भरा, तात्काळ डिस्काउंट मिळवा!

  BKC
  गुड न्यूज... पेट्रोल भरा, तात्काळ डिस्काउंट मिळवा!
  मुंबई  -  

  वाहन चालवणाऱ्यांसाठी अानंदाची बातमी. अाता पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकाला तात्काळ डिस्काउंटचा लाभ घेता येणार अाहे. इंडियन अाॅईलनं अाज वांद्रे-कुर्ला संकुलातील अापल्या पेट्रोलपंपावर या सुविधेचं अनावरण केलं. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी गेल्या वर्षी मोदी सरकारनं पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर क्रेडिट अथवा डेबिट कार्डचा वापर केल्यास, ०.७५ टक्के डिस्काऊंट देण्याची घोषणा केली होती. पण ग्राहकाच्या खात्यात तो डिस्काउंट दोन-तीन दिवसानंतर जमा व्हायचा. अाता इंडियन अाॅईलच्या सर्व पेट्रोलपंपावर तात्काळ डिस्काउंट मिळणार अाहे.


  कशी असेल प्रक्रिया?

  समजा ५०० रुपयांचं इंधन भरलं तर पूर्वी ग्राहकांच्या खात्यात दोन-तीन दिवसांनंतर ४ ते ५ रुपये जमा व्हायचे. अनेकांना हे पैसे कुठून येतात, हेच कळत नव्हतं. पण अाता या सुविधेमुळं, पेट्रोल भरल्यानंतर डेबिट-क्रेडिट कार्ड स्वाइप केल्यानंतर डिस्काउंटची रक्कम वजा करून उरलेली रक्कम म्हणजे ४९६ रुपये खात्यातून कापले जातील.


  इंडियन अाॅइलनं ग्राहकांना तात्काळ डिस्काउंट देणाऱ्या या सुविधेचं अनावरण अाज अापल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील पेट्रोलपंपावर केलं. लवकरच राज्यातील इंडियन अाॅइलच्या सर्व पेट्रोलपंपांवर ही सुविधा सुरू करण्यात येईल, असं इंडियन अाॅईलच्या एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.