Advertisement

एसीच्या तिकीटावर आता फर्स्ट क्लासचाही प्रवास


एसीच्या तिकीटावर आता फर्स्ट क्लासचाही प्रवास
SHARES

पश्चिम रेल्वेवर एसी लोकल दाखल झाल्यापासून या लोकलच्या तिकीट दरांपासून तिच्या वेळांपर्यंत अनेक गोष्टींच्या बाबतीत संभ्रम होता. त्यात मुंबईकरांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब म्हणजे एसी लोकलचे तिकीट किंवा पास असलेल्या व्यक्तीला साध्या लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे का? मात्र आता पश्चिम रेल्वेने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. आणि हीच मुंबईकरांसाठी खुशखबर आहे!


एसी लोकलच्या तिकीटावर फर्स्ट क्लासचा प्रवास

आता एसी लोकलचं तिकीट किंवा पास असलेली व्यक्ती साध्या लोकलच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करू शकणार आहे. त्यामुळे एसी लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी अशी परवानगी नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

एसी लोकलच्या कमी फेऱ्या असल्यामुळे या लोकलच्या पास किंवा तिकीटधारकांना बराच वेळ लोकलसाठी ताटकळत उभं रहावं लागत होतं. शिवाय, साध्या लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी नसल्यामुळे याच लोकलची वाट पहावी लागत होती. मात्र, आता त्यातून या प्रवाशांची सुटका झाली आहे.


फर्स्ट क्लासच्या तिकीटावरही एसीचा प्रवास

याशिवाय, फर्स्ट क्लासचे तिकीट किंवा पास असलेल्या व्यक्तीलाही एसी लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी त्या व्यक्तीला फर्स्ट क्लासचा तिकीट दर आणि एसी लोकलचा तिकीट दर यातली तफावत असलेली रक्कम द्यावी लागणार आहे. तसेच, असा प्रवास करणाऱ्या व्यक्तीला कोणताही दंड ठोठावला जाणार नाही. ट्विट करून पश्चिम रेल्वेने ही घोषणा केली आहे.



हेही वाचा

एसी लोकलमध्ये लवकरच ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा