Advertisement

एसी लोकलमध्ये लवकरच ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’?


एसी लोकलमध्ये लवकरच ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’?
SHARES

पश्चिम रेल्वेवर सुरू झालेल्या पहिल्या वातानुकूलित म्हणजेच एसी लोकलमध्ये अाता सामान्य लोकलप्रमाणेच हायर अाणि लोअर असे दोन क्लास करण्यात येणार असल्याची दाट शक्यता अाहे. फर्स्ट क्लासच्या भाड्यापेक्षाही जास्त भाडे असलेली एसी लोकल सध्या विरार ते चर्चगेटदरम्यान सेवा देत अाहे. सोमवार ते शुक्रवार १२ फेऱ्या असलेल्या या एसी लोकलला मात्र प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत अाहे. एसी लोकलचे भाडे जास्त असल्यामुळे तुरळक प्रवाशीच या लोकलने प्रवास करत असल्याचे निदर्शनास अाले अाहे. त्यामुळे एसी लोकलचे दर प्रवाशांना परवडण्याइतके असावेत, अशी सुचना पुढे अाली अाहे. या सर्व सूचनांवर लवकरच निर्णय घेण्यात येण्याची शक्यता अाहे.



रेल्वेच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा

रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा अश्विनी लोहाणी नुकत्याच मुंबई दौऱ्यावर अाल्या होत्या. मुंबईतील लोकलची स्थिती जाणून घेतानाच एसी लोकलविषयीही अनेक मुद्द्यांयवर या वेळी चर्चा झाली. या बैठकीत अनेक सूचना अाणि प्रस्ताव मांडण्यात अाले.


एसी लोकलची फर्स्ट, सेकंड क्लासमध्ये विभागणी?

सामान्य ट्रेनमध्ये फर्स्ट अाणि सेकंड क्लास वर्गासाठी जशी भाडेरचना अाहे, तशीच रचना एसी लोकलसाठीही वापरावी, असं दोन दिवसांपूर्वी मुंबई भेटीवर अालेल्या रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं अाहे. त्यामुळे अाता एसी लोकलमध्ये सामान्य लोकलप्रमाणेच फर्स्ट अाणि सेकंड क्लासची विभागणी करण्यात येणार अाहे.


हेही वाचा -

आता एसी लोकलचं तिकीटही मिळणार मोबाईलवर!

मुंबईकरांनो, कन्फ्युज नका होऊ!, 'हे' आहेत एसी लोकलचे दर आणि वेळापत्रक

 


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा