Advertisement

फास्टॅग वापरणाऱ्यांना टोलमध्ये ५ टक्के सवलत

११ जानेवारीपासून ही सवलत योजना सुरू होणार असून, ती मर्यादित कालावधीसाठी असेल.

फास्टॅग वापरणाऱ्यांना टोलमध्ये ५ टक्के सवलत
SHARES

फास्टॅग वाहनचालकांना आता टोलमध्ये ५ टक्के सवलत मिळणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी मार्गावरून प्रवास करणाऱ्या फास्टॅग धारकांसाठी ही सवलत देण्याची घोषणा राज्य रस्ते विकास महामंडळाने केली आहे. 

११ जानेवारीपासून ही सवलत योजना सुरू होणार असून, ती मर्यादित कालावधीसाठी असेल. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूने प्रवास करणाऱ्यांना प्रत्येक फेरीला टोलच्या ५ टक्के रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल.

टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला आहे. देशातल्या सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर भरला जाणारा टोल १ डिसेंबर २०१९ नंतर फास्टॅगद्वारे भरण्यात यावा, असे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले होते. ही मुदत वाढवून १५ डिसेंबर करण्यात आली होती. मात्र, १ जानेवारीपासून ही सुविधा लागू करण्यात आली आहे. परंतु मुंबईतील वाहनांसाठी १५ फेब्रुवारीपासूनपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर फास्टॅग  बंधनकारक असणार आहे. 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यभरातील पथकर नाक्यांवर फास्टॅग प्रणालीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांची समन्वय संस्था म्हणून नियुक्ती केली आहे.



हेही वाचा -

विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी

विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा