Advertisement

बेस्टच्या कंत्राटी बस चालकांचा आजही संप सुरू, प्रवाशांचे हाल

अचानक संप केल्यामुळे गुरुवारी बेस्टच्या प्रवाशांचे हाल झाले.

बेस्टच्या कंत्राटी बस चालकांचा आजही संप सुरू, प्रवाशांचे हाल
(Representational Image)
SHARES

मुंबईत बेस्टच्या कंत्राटी बस चालकांनी आजही काम बंद आंदोलन पुकारले आहे. कंत्राटदारानं वेतन न दिल्यानं बस चालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. गुरुवारीदेखील तीन आगारातील बस चालकांनी अचानक संप केल्यामुळे गुरुवारी बेस्टच्या प्रवाशांचे हाल झाले.

वडाळा, वांद्रे आणि विक्रोळी या आगारातील कंत्राटी बस चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले. एम. पी. ग्रुपच्या कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर चालवण्यात येणाऱ्या १७५ बसगाड्या वेळापत्रकानुसार चालवणं आवश्यक होतं. परंतु कामगारांचे वेतन न दिल्यामुळे वडाळा वांद्रे आणि विक्रोळी या आगारांमधून एकही बस गाडी आगाराबाहेर निघाली नाही. त्यामुळे सकाळीच कामावर निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानं इतर मार्ग तसंच इतर आगारांमधून ८६ बसेस या चालवल्या आहेत. काम बंद आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसल्याने बेस्ट प्रशासनाने कंत्राटदाराविरोधात करारातील अटींनुसार कारवाईचे संकेत दिले आहेत.

संपाच्या परिणामी दादर रेल्वे स्थानकाजवळून टाटा, केईएम रुग्णालयमार्गे जाणाऱ्या बेस्ट बस बंद असल्यानं रुग्णांचे हाल होत आहेत.

बेस्टच्या प्रशासनानं सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बोलणी केली. बेस्ट प्रशासन बेस्टचे इतर नियमित कामगार नेमून बेस्ट बस सेवा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.हेही वाचा

डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये 'ही' नवी सुविधा सुरू, प्रवाशांसाठी फायदेशीर

बेस्टमध्ये टॅप-इन/टॅप-आउट तिकीट सेवा 'या' आठवड्यापासून होणार सुरू

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा