Advertisement

मुंबईच्या रस्त्यावर लवकरच धावणार ४ चाकी रिक्षा

मुंबईच्या रस्त्यावर लवकरच रिक्षा धावणार आहे.

मुंबईच्या रस्त्यावर लवकरच धावणार ४ चाकी रिक्षा
SHARES

मुंबईच्या रस्त्यावर लवकरच ४ चाकी रिक्षा धावणार आहे. 'क्वाड्रिसायकल' असं या रिक्षाचं नाव आहे. 'क्वाड्रिसायकल' अशा एकून ५ रिक्षांची आरटीओ मुंबई पश्चिम विभागाकडं नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं आता मुंबईकरांना टॅक्सी, बस गाड्यांसोबत रिक्षानंही प्रवास करता येणार आहे.


४ चाकी रिक्षा

मुंबईमध्ये या चारचाकी रिक्षांचा आकडा अंदाजे १५-२० इतका आहे. काही वर्षातच ४ चाकी रिक्षांची मागणी देखील वाढेल, असा विश्वास विभागाकडून व्यक्त केला जात आहे. कित्येक दशकांपासून तीन चाकांवर सार्वजनिक वाहतुकीचा भार सांभाळणाऱ्या तीनचाकी रिक्षाला आता चारचाकी क्वाड्रिसायकलचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ही क्वाड्रिसायकल पारंपरिक रिक्षाची काळी-पिवळी ओळख कायम राखणार आहेत.


सुरक्षित प्रवास

सद्यस्थितीत मुंबईमध्ये अडीच लाखांहून अधिक रिक्षा धावत आहेत. सर्वसाधारणपणे रिक्षांमधून ३ प्रवासी प्रवास करू शकतात. मात्र, अनेक रिक्षा चालकांकडून गर्दीच्या वेळी सर्रास आपल्या दोन्ही बाजूंना प्रवाशांना बसवले जाते. मात्र क्वाड्रिसायकलमध्ये ४ प्रवाशांना आरामात, सुरक्षित प्रवास करता येणार आहे.


रिक्षाचं वैशिष्ट्य

  • क्वॉड्रिसायकल एका लिटरमध्ये (पेट्रोल) सरासरी ३५ किलोमीटर अंतर
  • इतर कोणत्याही वाहनापेक्षा ४० टक्के कमी कार्बन डायऑक्साईड वायू उत्सर्जन
  • इंधन बचत, सीएनजीमध्ये उपलब्ध
  • रिक्षाची इंजिन क्षमता २१६सीसी
  • एकावेळी ४ प्रवासी



हेही वाचा -

कांद्याचे दर लवकरच १५० रुपये किलो

मुंबईकरांना थंडीची केवळ चाहूलच



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा