
अवकाळी पावसामुळं राज्यभरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानं झालं आहे. या पावसामुळं भाजीपाल्याचं नुकसानं झालंचं आहे. मात्र, कांद्यांनं मुंबईकरांना रडवलं आहे. कारण आता, कांदा लवकरच प्रति किलो १५० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता बाजारात व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याची आवक निम्म्याहून कमी झाली आहे. त्यामुळं अनेक बाजारांतील दर १०० रुपये पार झालं असून, ते आणखी भडकण्याची चिन्हं आहेत.
लांबलेला पावसाळा व त्यानंतरच्या अवकाळी पावसामुळं यंदा शेतीला मोठा फटका बसला आहे. त्यामध्ये सर्वाधिक नुकसान कांद्याचं झालं आहे. कांद्याचं सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या नाशिक व जळगाव पट्ट्यात कांद्याचं जवळपास पूर्ण पीक पावसात भिजलं. पावसाळा ओसरल्यानंतरही चक्रीवादळ आल्यानं काढलेला कांदा भिजला. त्यामुळंच कांद्याचं दर वधारू लागले आहेत.
मुंबई शहरात सध्या दररोज ५० ते ६० गाड्याच कांदा येत आहे. त्यामधील ८० टक्के माल उत्तर महाराष्ट्रातीलच आहे. पावसामुळं ओलसर झालेला कांदा अद्यापही पूर्ण सुकलेला नाही. यामुळं चांगल्या प्रतीचा कांदा तुरळक प्रमाणात बाजारात आहे. त्यामुळं घाऊक बाजारातच तो ६० ते ८० रुपये तर किरकोळ बाजारात ९० ते १२० रुपये किलो आहे.
हेही वाचा -
मुंबईकरांना थंडीची केवळ चाहूलच
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
