Advertisement

मुंबईकरांना थंडीची केवळ चाहूलच

यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी मुंबईकर अद्याप थंडीच्या प्रतिक्षेत आहे.

मुंबईकरांना थंडीची केवळ चाहूलच
SHARES

यंदा नोव्हेंबर महिना उजाडला तरी मुंबईकर अद्याप थंडीच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईचा किमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर असला, तरी वातावरणात रात्री गारठा जाणवायला सुरुवात झाली आहे. दिवसा मात्र तापमानात घट होण्याची प्रतीक्षा कायम आहे. कोकण विभाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात किमान तापमान १८ अंश आणि त्या खाली उतरले आहे. मुंबईत सांताक्रूझ इथं बुधवारी सकाळी २१.४ तर कुलाबा इथं २३.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. हे तापमान सरासरीहून जास्त होते. तरीही सकाळी होणारी गारठ्याची जाणीव हळुहळू वाढू लागली आहे.

कमी किमान तापमान

मुंबईचं तापमान नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजून २० अंशांच्या खाली नोंदवलं गेलेलं नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरचे सर्वात कमी किमान तापमान १९.२ तर त्याच्या आदल्या वर्षी १८ अंश सेल्सिअस होतं. सन २०१६ मध्ये १६.३ पर्यंत नोव्हेंबरचा पारा खाली उतरला होता. या तुलनेत अजून नोव्हेंबरचा किमान तापमानाचा पारा तेवढा खाली उतरलेला नाही. त्यामुळं थंडीच्या आगमनाची चाहूलच गेले कित्येक दिवस मुंबईकर अनुभवत आहेत.

फारसा बदल

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील २ ते ३ दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये देशभरात फारसा बदल अपेक्षित नाही. त्यामुळं थंडीचा खऱ्या अर्थानं अनुभव घेण्यासाठी डिसेंबर महिन्याचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे.

उन्हाची जाणीव

मुंबईत सकाळी नोंदवल्या जाणाऱ्या तापमानाच्या तुलनेत दुपारनंतर मात्र उन्हाचीही जाणीव होत आहे. बुधवारी सांताक्रूझ इथं कमाल तापमान ३४.० तर कुलाबा इथं कमाल तापमान ३४.५ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. मुंबईचं कमाल तापमान मंगळवारीही ३४ अंशांपलीकडं होतं.



हेही वाचा -

अजित पवारांची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी

हायकोर्टाला चिंता शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेची



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा