Advertisement

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत रिक्षासेवा

डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एक रिक्षाचालक मोफत रिक्षासेवा देत आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोफत रिक्षासेवा
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमावर सामान्यांना घरातून बाहेर पडण्यास असून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्यास परवानगी आहे. हे सर्व कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. त्यामुळं या डॉक्टर, नर्स, पोलीस, सरकारी कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एक रिक्षाचालक मोफत रिक्षासेवा देत आहे.

दत्ताराम इंगवले असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. चेंबूरमधील घाटला परिसरात राहणारे हे दत्ताराम इंगवले हे पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आणि सरकारी अधिकारी यांना मोफत सेवा देत आहेत. पोलीस, डॉक्टर, सरकारी कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे शुल्क ते घेत नाहीत.

कोरोनाच्या पार्श्वभूमावर राज्य सरकारनं सर्व प्रकारची वाहतूक सेवा बंद केली आहे. त्यामुळं अनेकांचे हाल होत आहे. अशा परिस्थितीत या सरकारी कर्मचाऱ्यांना अढथळ्यांना समोरं जावं लागू नये यासाठी इंगवले मोफत रिक्षासेवा देत आहेत. त्यांच्या यासेवेमुळं अनेकांना दिलासा मिळत आहे.

मुंबईसर राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील धारावी परिसराला कोरोनानं चांगलंच टार्गेट केलं आहे. धारावीत ३४ नवे रुग्ण आढळले असून, रुग्णांचा आकडा २७५ वर पोहोचला आहे. तसंच, या संसर्गावर मात करण्यांची संख्याही वाढत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा