मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दराने ९२ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव ९२.०४ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर डिझेल ८२.४० रुपयावर पोहोचले आहे.
आंतररराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात वाढ होत असल्याने देशातील पेट्रोलियम कंपन्या याचा भार ग्राहकांवर टाकत आहेत. मागील काही दिवसांपासून पेट्रोलियम कंपन्यानी इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात २४ पैसे तर डिझेलच्या दरात २७ पैशांनी वाढ झाली आहे. मुंबईत प्रथमच पेट्रोलने ९२ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई आणि दिल्लीत पेट्रोल उचांकी स्तरावर कायम असल्याने ग्राहकांना झळ बसत आहे.
इंधनाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे वाहतुकीचे दर वाढणार असल्याने महागाई भडकणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शुक्रवारी झालेल्या दरवाढीने मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव ९२.०४ रुपये झाला आहे. तर एक लीटर डिझेल ८२.४० रुपयावर पोहोचले.