Advertisement

लोअर बर्थ हवी आहे ? तर 50 रूपये जास्त मोजा


लोअर बर्थ हवी आहे ? तर 50 रूपये जास्त मोजा
SHARES

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे तिकिट बुक करताना लोअर बर्थ हवा असल्यास त्यासाठी आता 50 रुपये जास्त मोजण्याची तयारी ठेवा. कारण रेल्वे प्रशासन लवकरच लोअर बर्थसाठी अतिरिक्त वाढीव शुल्क घेण्याकरीता नवे धोरण आणण्याच्या तयारीत अाहे.

लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यानुसार लोअर बर्थची मागणीही आपसूकच वाढत आहे. ठराविक सीटच्या वाढत्या मागणीनुसार त्यावर वाढीव शुल्क आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.

लांब पल्ल्याच्या गाडीने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी आता ऑनलाईन तिकीट बुक करतात. आपल्याला हवी तशी सीट मिळावी, हा उद्देश त्यामागे असतो. रेल्वेचे तिकीट काढताना प्रवाशाला अप्पर बर्थ, मीडल बर्थ आणि साईड अप्पर बर्थ असे पर्यायही उपलब्ध असतात. परंतु बहुतांश प्रवाशांचा कल लोअर बर्थ निवडण्याकडे असतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लोअर बर्थची मागणी करणाऱ्या प्रवाशांकडून 50 रुपये अतिरिक्त शुल्क घेण्याचे ठरवले आहे. रेल्वे सध्या आर्थिक तोट्यातून जात असल्यामुळे आपले उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन शक्कल लढवत आहे. हा देखील त्याचाच एक भाग आहे. 

रेल्वेला उत्पन्न वाढवायचे असेल, तर प्रवाशांना तोट्यात न टाकाता आरक्षित तिकिटात जो भ्रष्टाचार होत आहे, तो कमी करायला हवा.

- समीर झवेरी, रेल्वे प्रवासी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा