आरपीएफ पोलिसांनी दिला हरवलेला मोबाईल

 Borivali
आरपीएफ पोलिसांनी दिला हरवलेला मोबाईल

बोरिवली- गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता बोरिवली यार्डच्या लोकल ट्रेनमध्ये आरपीएफ पोलीस अधिकारी नवीन कुमार यांना सॅमसंग जे-7 मोबाईल सापडला. नवीन यांनी वरिष्ठ अधिकारी के.के. मीणा यांना ही माहिती दिली. मीणा यांनी मोबाईल ऑन केला आणि डायल नंबरमधल्या एका नंबरवर संपर्क केला. त्यानंतर हा मोबाईल मालाडमध्ये राहणाऱ्या अंजू देवेंद्र सिंह यांचा असल्याचं सामजलं. त्यानंतर सॅमसंग जे-7 अंजूकडे सुपूर्द करण्यात आला.

Loading Comments