एमटीएचएलसाठी सल्लागाराची नियुक्ती

  Pali Hill
  एमटीएचएलसाठी सल्लागाराची नियुक्ती
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई आणि नवी मुंबईला थेट जोडत नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आलेला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आता लवकरच मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं शुक्रवारी मे.एइकॉम एशिया कंपनी लिमिटेड(हाँगकाँग) पडेको कंपनी लि.(जपान), दार-अल-हंदाश (लेबनाॅन),टीवाय लिन इंटरनँशनल (अमेरीका) या टीमची सर्वसाधारण सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आलीय. एमएमआरडीए प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आलीय. त्यानुसार आताही ही सल्लागार टीम प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यापासून प्रकल्पासाठीच्या आवश्यक परवानग्या मिळवणे, कंत्राटदारांनी तयार केलेले संकल्पचित्र तपासणे, बांधकामावर देखरेख ठेवणे अशी सर्व कामे पाहणार आहे. दरम्यान शुक्रवारच्या बैठकीत दहिसर ते डीएननगर मेट्रो-2-अ आणि दहिसर (पू) ते अंधेरी (पू) मेट्रो-7 या प्रकल्पासाठी 340 कोटी रुपयांचा निधी दिल्ली मेट्रो रेल काँर्पोरेशनला देण्यासही मान्यता देण्यात आली. त्यानुसार मेट्रोचे डब्बे, संकेत आणि दूरसंचारकरिता पुरवठा आणि प्रकल्प सुरू करण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे हे दोन्ही मेट्रो प्रकल्पही आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.