Advertisement

गोरेगाव-पनवेल थेट लोकल सेवेला मुहूर्त कधी?


गोरेगाव-पनवेल थेट लोकल सेवेला मुहूर्त कधी?
SHARES

सीएसएमटी ते अंधेरी हार्बर मार्गाचा एप्रिलमध्ये गोरेगावपर्यंत विस्तार होऊन सात महिने उलटले तरी गोरेगाव-पनवेल थेट लोकल सेवेला मुहूर्त अजूनही मिळालेला नाही.


मुहूर्त कधी?

मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून गोरेगावपर्यंत हार्बरच्या विस्ताराचं काम 2009 साली हाती घेण्यात आलं होतं. या कामातील अनेक तांत्रिक अडथळ्यांनंतर अखेर 29 मार्च 2018 पासून ही सेवा सुरू झाली. त्यानंतर 1 एप्रिलपासून सीएसटीएम ते अंधेरीपर्यंत 42 आणि चर्चगेट ते अंधेरीपर्यंत सात नवीन फेऱ्यांचा गोरेगावपर्यंत विस्तार करण्यात आला.

याशिवाय पश्चिम रेल्वेने 1 नोव्हेंबरपासून हार्बर-अंधेरीपर्यंत आणखी 110 लोकल फेऱ्यांचाही गोरेगावपर्यंत विस्तार केला. मात्र आता गोरेगाव-पनवेल थेट लोकल सेवेला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

गोरेगाव ते पनवेल थेट लोकल सेवा पावसाळ्यानंतर सुरू करण्याचा प्रयत्न होता, आता त्याला आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती मिळते.

संबंधित विषय