स्वच्छतेचे संदेश देणाऱ्यांनीच केली अस्वच्छता

 Goregaon
स्वच्छतेचे संदेश देणाऱ्यांनीच केली अस्वच्छता
स्वच्छतेचे संदेश देणाऱ्यांनीच केली अस्वच्छता
See all

गोरेगाव - 'हमारा स्टेशन हमारी शान' या योजनेंतर्गत रेल्वे प्रशासनाने मुंबई फर्स्ट मेकिंग ए डिफरन्स या संस्थेच्या साहाय्याने गोरेगाव स्थानकाचा कायापालट करण्याचा विडाच उचलला आहे. त्यानुसार गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या भिंती स्वच्छ करण्यात आल्या, तिथे चित्रंही काढण्यात आली. पण रंगाचे डबे, ब्रश, खोकी, खाली सांडलेला रंग हे सर्व तसंच पडून राहिलं आहे. चार दिवसांपासून हे सामान तसंच पडून आहे. रेल्वे प्रशासनाच्या सफाई कामगारांनीही हे सामान उचलण्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळं स्थानकाच्या भिंती चित्राने रंगल्या, सजल्या पण त्या नंतरची साफसफाई कोण करणार, असा सवाल प्रवाशांना पडलाय.

Loading Comments