मुंबईकरांना साद..'हक ना छीनो'

Mumbai
मुंबईकरांना साद..'हक ना छीनो'
मुंबईकरांना साद..'हक ना छीनो'
मुंबईकरांना साद..'हक ना छीनो'
मुंबईकरांना साद..'हक ना छीनो'
See all
मुंबई  -  

मुंबई - मुंबईची जीवन वाहिनी म्हणून लोकलचा उल्लेख आवर्जून केला जातो. दिवसेंदिवस लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. हा प्रवास सामान्य प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतो. लोकल ट्रेनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी चढण्यासाठी प्रवाशांची तारांबळ उडते. अशातच दिव्यांगांसाठी असलेल्या डब्यात कमी गर्दी असते म्हणून धडधाकट प्रवासीही बसतात.


या प्रकाराबाबत प्रवाश्यांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न काही पत्रकारांनी आरपीएफ आणि प्रहार रेल्वे अपंग संघटना यांच्या साहाय्याने केला. यासाठी एक छोटीशी फिल्म फोकस फाउंडेशन या पत्रकारांच्या संघटनेनं बनवली. 2 मिनिटांच्या या फिल्मचं उद्घाटन आरपीएफचे आयजी अतुलकुमार श्रीवास्तव आणि प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील आरपीएफ मुख्यालयात करण्यात आलं.

या वेळी रेल्वेचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रणवकुमार, वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी फोकस फाउंडेशनने यापूर्वी मुंबई पोलिसांसाठी बनवलेल्या बॅग चोरीची तसेच आरपीएफसाठी बनवलेल्या बॅग बदलीची फिल्म दाखवण्यात आली. तसच आयजी अतुलकुमार श्रीवास्तव यांनी रेल्वेसाठी तयार केलेल्या या फिल्मच कौतुक केलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.