पनवेलहून थेट गोरेगाव लोकल, हार्बर रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

पनवेलहून गोरेगावला जाणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरच थेट लोकल सुरू होणार आहे.

SHARE

हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पनवेलहून गोरेगावला जाणाऱ्या प्रवाशांसाठी लवकरच थेट लोकल सुरू होणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल-गोरेगाव लोकलची चाचणी घेण्यासाठी  तपासणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे. ही तपासणी यशस्वी ठरल्यास पनवेलवरून गोरेगाव लोकल मार्गस्थ होणार आहे. त्यामुळं  हार्बर मार्गावरील प्रवाशांची लोकल बदलण्याच्या त्रासातून सुटका होणार आहे.

अंधेरी लोकल सुरू

सध्या पनवेलवरून अंधेरी लोकल सुरू आहे. गोरेगावपर्यंत प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अंधेरी स्थानकात उतरून लोकल बदलावी लागत आहे. त्यामुळं रेल्वे प्रशासनानं थेट गोरेगावपर्यंत लोकल मार्गस्थ करण्याच्या हालचाली सुरू केली आहे.

चाचणीपूर्व तयारी पूर्ण

रेल्वे प्रशासनाकडून पनवेल-गोरेगाव लोकलसाठीची चाचणीपूर्व तयारी पूर्ण करण्यात आल्यानं येत्या काही महिन्यांत चाचणी यशस्वी करून लोकल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.हेही वाचा -

बेस्टच्या २०० बसगाड्या रखडल्या, कंत्राटदाराची माघार

अकरावी प्रवेशाचं वेळापत्रक जाहीरसंबंधित विषय
ताज्या बातम्या