Advertisement

सामान्यांना अद्याप परवानगी नाही, मात्र फेरीवाल्यांचा लोकल प्रवास

महिला प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येनंतर फेरीवाल्यांनीही (hawkers) याच डब्याकडं मोर्चा वळवल्यानं कोरोनाकाळात प्रवास करताना अन्य महिलांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सामान्यांना अद्याप परवानगी नाही, मात्र फेरीवाल्यांचा लोकल प्रवास
SHARES

कोरोनामुळं (coronavirus) मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) बंद ठेवण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं निदर्शनास येत असताना रेल्वे प्रशासन (railway) व राज्य सरकारनं (state government) लोकल सेवा सुरू केली. सुरूवातीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली लोकल सेवा आता इतर कर्मचारी वर्गासाठी सुरू करण्यात आली असून, विशेष म्हणजे सरसकट महिलांनाही लोकल प्रवासाची (women passengers) मुभा देण्यात आली आहे. मात्र, सर्वासामान्या प्रवासी अद्याप प्रतिक्षेतच आहे. असं असताना मात्र, महिला प्रवासी डब्यात फेरीवाले दिसत आहेत.

महिला प्रवाशांच्या वाढलेल्या संख्येनंतर फेरीवाल्यांनीही (hawkers) याच डब्याकडं मोर्चा वळवल्यानं कोरोनाकाळात प्रवास करताना अन्य महिलांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडं तक्रारी आल्यानंतर मागील ४ दिवसांत १० पेक्षाही जास्त फेरीवाल्यांची धरपकड करण्यात आल्याची महिती समोर येत आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेली लोकल सर्वच महिलांसाठीही २१ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली. सामान्य महिला प्रवाशांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ नंतर लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. अन्य वेळेत अत्यावश्यक सेवा (essential workers) कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणालाही प्रवेश नसल्याचं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं.

सामान्य महिलांसाठी लोकल प्रवास खुला झाल्यानंतर फेरीवाल्यांनीही बस्तान मांडलं आहे. फेरीवाले स्कार्फ, रुमाल तसंच अन्य वस्तूंची विक्री सर्रास करत आहेत. या वस्तूंची विक्री करणाऱ्या महिला स्थानकात प्रवेश करताना चांगल्या प्लास्टिकच्या पिशवीतून वस्तू आणतात आणि प्रवेश मिळवल्यानंतर लोकलमध्ये वस्तूंची विक्री करण्यास सुरुवात करत आहेत.

दुसऱ्या एखाद्या स्थानकात उतरण्यापूर्वी त्या वस्तू पुन्हा पिशवीत ठेवून उतरून निघून जातात. त्यामुळं कोणालाही या महिलांवर संशय येत नाही. फेरीवाल्यांच्या सामानामुळं अन्य महिलांना मात्र धक्काबुक्कीला सामोरं जावं लागतं. महिला प्रवासी डब्यात फेरीवाले येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरपीएफकडून ९ महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांचं पथक बनवण्यात आलं आहे. कल्याणपासून दादरपर्यंत हे पथक सकाळी ११ वाजल्यानंतरच्या लोकल फेऱ्यांवर लक्ष ठेवून असतं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा