
कोकण रेल्वे मार्गावरून अतिरिक्त मेमू ट्रेन धावणार असून वीकेंडला धावणाऱ्या या ट्रेनमुळे कोकणवासियांना मोठा फायदा होणार आहे.
1 मे ते 7 जूनदरम्यान ही विशेष मेमू ट्रेन धावणार आहे. दिवा ते चिपळूण अनारक्षित मेमू ट्रेन आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.
ही मेमू लोकल आठ डब्ब्यांची असून वीकेंडदरम्यान तीन दिवस धावणार आहे. त्यामुळे महिन्याभरात दिवा ते चिपळूण 18 आणि परतीच्या मार्गावर चिपळूण ते दिवा 18 अशा एकूण 36 फेऱ्या होतील.
परंतु, ही ट्रेन केवळ आठ डब्ब्यांची असून त्यात आठवड्यातून फक्त तीन दिवस धावणार असल्यामुळे प्रवाशांना कितपत फायदा होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरवर्षी उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी ट्रेनची मागणी पाहून कोकण रेल्वे मार्गावर ही विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरुवारी याबद्दल अधिकृत वेळापत्रक जारी केलं गेलं आहे. या वेळापत्रकानुसार दिवा ते चिपळूण अनारक्षित मेमू सेवा आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस धावणार आहे.
शाळा-कॉलेजला सुट्ट्या लागल्यानंतर सर्वांची पावले शहरापासून गावच्या दिशेने धावू लागतात. अशा वेळी कोकण रेल्वे मार्गावर आधीच गाड्यांची संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे ही विशेष मेमू ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ट्रेन क्रमांक 01160 चिपळूण-दिवा स्पेशल अनारतक्षित मेमू ट्रेन चिपळूण स्थानकावरून दुपारी 15.30 वाजता सुटणार आहे. त्याच दिवशी रात्री 23.10 वाजता ही ट्रेन दिवा जंक्शन रेल्वे स्थानकावर दाखल होईल.
दरम्यान, दिव्यावरून गाडी क्रमांक 01159 दिवा-चिपळूण स्पेशल अनारक्षित मेमू ट्रेन रात्री 23.25 वाजता रवाना होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी ही ट्रेन 6.30 वाजता चिपळूण येथे दाखल होईल.
दिवा-चिपळूण विशेष मेमू ट्रेन अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आप्टा, सोमटणे, पनवेल, कळंबोली, तळोजा पांचनंद आणि निळजे या रेल्वे स्थानकांवर थांबेल.
हेही वाचा
