Advertisement

यूटीएस अॅपद्वारे तिकीट काढा, 5 टक्के बोनस मिळवा


यूटीएस अॅपद्वारे तिकीट काढा, 5 टक्के बोनस मिळवा
SHARES

आज सर्वच गोष्टी डिजिटल झालेल्या असताना तिकीटसुद्धा अॅपद्वारे काढता यावी, यासाठी मुंबई रेल्वे बोर्डाकडून यूटीएस नावाचं अॅप तयार करण्यात आलं. हे अॅप प्ले स्टोरवरून डाऊनलोड केल्यानंतर त्याद्वारे तिकीट काढताना दरवेळी आर व्हॅलेट रिचार्ज केल्यास 5 टक्के बोनस देण्यात येणार. 

या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना डिजिटल तिकिटिंगशी जोडण्याचा मानस असल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. सुरुवातीला हे अॅप वापरत असताना नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेता पश्चिम रेल्वेकडून यूटीएसच्या प्रचारासाठी विशेष अभियान आयोजित करण्यात आलं होतं. 


वापरकर्ते 220 टक्यांनी वाढले

2017 च्या तुलनेत 2018 मध्ये डिजिटल तिकीट काढणाऱ्यांमध्ये 220 टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्यामुळे तिकीट खिडक्यांवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यावर्षी दिलेल्या अतिरिक्त सुविधांचा वापर करत जास्तीत जास्त लोकांनी यूटीएस हे अॅप वापरण्याचं आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आलं आहे.


अॅपचा फायदा?

  • अँड्रॉईड, आयएसओ, आणि विंडोज आधारित स्मार्ट फोनवर सहज उपलब्ध
  • सर्व अनारक्षित आणि सिजनेबल तिकीट काढता येतील
  • क्विक बुकिंग करता येईल
  • सर्व स्थानकावर क्यूआर कोड उपलब्ध त्याला स्कॅन करून त्वरित तिकीट मिळवता येईल
  • पेपरलेस आणि पेपर असे दोन्ही पर्याय उपलब्ध
  • कस्टमर केयर नं 138 वर केव्हाही संपर्क करता येईल
  • तिकीट खिडकी, पेटीएम, मोबिक्विक, फ्री चार्ज या कुठल्याही माध्यमातून रिचार्ज करता येईल
  • 23 ऑगस्ट 2018 पर्यंत प्रत्येक रिचार्जवर 5 टक्के बोनस
  • इंटरनेट नसतांनाही तिकीट चेकिंग स्टाफला तिकीट दाखवण्याची सोय
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा