Advertisement

रेल्वेचा प्रवास होणार महाग, स्टेशनवर युजर फी लागू होऊ शकते

अधिक गर्दी असलेल्या स्थानकांवर भारतीय रेल्वे अधिक शुल्क आकारण्याची तयारी करत आहे.

रेल्वेचा प्रवास होणार महाग, स्टेशनवर युजर फी लागू होऊ शकते
SHARES

येत्या काही महिन्यांमध्ये रेल्वेनं प्रवास करणं महागात पडू शकतं. अधिक गर्दी असलेल्या स्थानकांवर भारतीय रेल्वे अधिक शुल्क आकारण्याची तयारी करत आहे. प्रवाशांना ते स्वतंत्रपणे द्यावे लागणार नाहीत. त्याचा समावेश तिकिटातच केला जाईल.

रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.के. यादव म्हणाले की, अतिरिक्त फीचा वापर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी आणि आधुनिकीकरणासाठी केला जाईल.

यादव म्हणाले, "ज्या स्टेशनवर अधिक गर्दी असते किंवा प्रवाशांची रहदारी अधिक असते अशा स्टेशनवर अधिक शुल्क आकारले जाईल. आम्हाला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची गरज आहे. एकूण ७ हजार स्थानकांपैकी केवळ १० ते १५ टक्के जागी अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

याचा अर्थ असा होईल की ७०० ते १००० स्थानकांवर रेल्वे अत्रिक्त शुल्क लागू करू शकते. शुल्काची रक्कम अद्याप ठरलेली नाही.

यादव पुढे म्हणाले की, स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू होईपर्यंत हे अतिरिक्त शुल्क म्हणून वसूल केलेली रक्कम स्थानकांवरील प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वापरली जाईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर या रकमेमधून तिकिटात देण्यात आलेल्या सवलतींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई होईल. अतिरिक्त शुल्काची रक्कम इतकी कमी असेल की प्रवाशांना त्रास होणार नाही.

यापूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांनी अनेकदा असं म्हटलं होतं की, ज्या स्थानकांचा विकास झाला असेल तिथेच अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी रेल्वे देशातील सर्व प्रमुख स्थानके श्रेणीसुधारित करण्याचा विचार करीत असल्याचंही वृत्त आहे. त्याचबरोबर, वापरकर्ता फी आकारण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्यानं पूर्ण केली जाईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही याची पुष्टी केली आहे.

स्टेशन्सवर वापरण्यात येणारे शुल्क विमानतळांवरील यूजर डेव्हलपमेंट फी (यूडीएफ)च्या धर्तीवर असेल. तथापि, यूडीएफ शहरापेक्षा भिन्न आहे. रेल्वे स्थानकांवर गर्दी आणि स्थानक विस्तारीत करणं किंवा पुनर्विकास करण्याच्या गरजेवर आधारित वापरकर्ता शुल्क निश्चित केलं जाऊ शकतं.हेही वाचा

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईत 'नो इंन्ट्री', जाणून घ्या का आणि किती दिवस?

मेट्रो २ बी मार्गावरील 'ही' स्थानके रद्द

Read this story in हिंदी
संबंधित विषय