Advertisement

मेट्रो २ बी मार्गावरील 'ही' स्थानके रद्द

मेट्रो २ बी डीएन नगर ते मंडाले या मार्गावर धावणार आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण २२ स्थानके आहेत.

मेट्रो २ बी मार्गावरील 'ही' स्थानके रद्द
SHARES

मेट्रो २ बी मार्गिकेवरील कुर्ला टर्मिनल आणि एमएमआरडीए कार्यालय ही दोन स्थानकं आता रद्द करण्यात आली आहेत.  मेट्रो २ बी मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल आणि निविदेत या स्थानकांचा उल्लेख आहे. मात्र नवीन माहितीमध्ये ही स्थानके वगळली असल्याचं समोर आलं आहे. 

मेट्रो २ बी डीएन नगर ते मंडाले या मार्गावर धावणार आहे. या मेट्रो मार्गिकेवर एकूण २२ मेट्रो स्थानके आहेत. कुर्ला टर्मिनल मेट्रो स्थानक हे मध्य रेल्वेवरील कुर्ला स्थानकाच्या जवळ होते. हे स्थानक आणि जवळचे एस जी बर्वे मार्ग मेट्रो स्थानक या दोन्ही स्थानकातील अंतर केवळ ४७४ मीटर आहे. याशिवाय येथे फनेल झोनमुळे उंचीस असलेल्या मर्यादेमुळे हे स्थानक वगळलं असल्याचं एमएमआरडीएने म्हटलं आहे.

तसंच सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि दुसऱ्या बाजूस असलेले अन्य कायमस्वरूपी बांधकाम यामध्ये कुर्ला टर्मिनल मेट्रो स्थानक प्रस्तावित होते. येथे प्रवाशांच्या प्रवेशासाठी सुयोग्य स्थिती नसल्याचे कारण एमएमआरडीएने दिले आहे. तर कलानगर उड्डाणपुलाचा रॅम्प आणि एमएमआरडीए कार्यालय स्थानक एकमेकास प्रतिकूल असल्याने ते स्थानक वगळले आहे. आयकर मेट्रो स्थानक २२० मीटरने कुटुंब न्यायालयाच्या दिशेस स्थलांतरित केल्याचं एमएमआरडीएने सांगितलं आहे.

 कुर्ला स्थानक वगळल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे आक्षेप नोंदविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांस पत्र पाठवून हे स्थानक न वगळण्याची मागणी त्यांनी केली आहे.


हेही वाचा

रशिया देणार भारताला कोरोना वॅक्सीनचे १०० दशलक्ष डोस

कोरोनामुळे ६४ डॉक्टर्स, १५५ आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पण IMAची आकडेवारी वेगळी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा