Advertisement

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईत 'नो इंन्ट्री', जाणून घ्या का आणि किती दिवस?

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईत 'नो इंन्ट्री', जाणून घ्या का आणि किती दिवस?
SHARES

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. कारण कंपनीनं २ वेळा नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांना दुबईत प्रवेश नाकारण्यात आला आहे. दुबईला एअर इंडियाच्या विमानातून गेलेल्या करोनाग्रस्त प्रवाशांच्या उपचाराचा आणि क्वारंटाइन ठेवण्याचा खर्चही एअर इंडियाला करावा लागणार आहे.

दुबईसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसला पुन्हा विमानं सुरू करण्यासाठी, असे प्रकार पुन्हा थांबवण्यासाठी आणि सुधारणा करण्यास सांगण्यात आलं आहे. ४ सप्टेंबर रोजी जयपूरवरून दुबईला जाणार्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशानं प्रवास केला होता. तसंच त्याला त्यापूर्वीच करोनाची लागण झाली होती. परंतु त्यानंतरही कंपनीनं त्याला प्रवास करण्यास दिल्याचं सांगण्यात येत आहे.

  • सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं संयुक्त अरब अमिरातीला जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी गेल्या महिन्यापासून कोरोनाची चाचणी अहवाल अनिवार्य केले आहेत.
  • १२ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असेलेल्या प्रवशांना विमानात प्रवास करण्यापूर्वी आपले नेगेटिव्ह कोरोना अहवाल दाखवावा लागेल.
  • मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रवाशांना सरकारमान्य चाचणी केंद्रातून नेगेटिव्ह अहवाल मिळवणं अनिवार्य आहे.
  • सर्वांची कोविड १९ पीसीआर चाचणी करणंही अनिवार्य आहे. परंतु विमान उड्डाण करण्याच्या ९६ तासांपूर्वीचंही ते असू नये असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.

विमान कंपन्यांसाठी तयार केलेल्या नियमांची निट अमलबजावणी न झाल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.



हेही वाचा

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यास आंदोलन - प्रवीण दरेकर

मेट्रो २ बी मार्गावरील 'ही' स्थानके रद्द

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा