Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यास आंदोलन - प्रवीण दरेकर


एसटी कर्मचाऱ्यांचे पगार न दिल्यास आंदोलन - प्रवीण दरेकर
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं राज्याची वाहतूक सेवा बंद होती. परंतु, या काळात काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळानं पुढाकार घेत वाहतूक सेवा पुरवली. या सेवेसाठी अनेक कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून कर्तव्य बजावत होते. मात्र, या कर्मचाऱ्यांवर आता आर्थिक संकट ओढवलं आहे. 

मागील ३ महिन्यांपासून पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांवर ही परिस्थिती आली आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर पगार द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ८ दिवसांत न दिल्यास राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. कर्मचाऱ्यांचे थकीत पगार आणि अन्य मागण्यांसाठी प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाने एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती मिळते.

यावेळी दरेकर यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या कारभारावरही ताशेरे ओढले. परिवहनमंत्री यांनी ३०० रुपयांचा भत्ता जाहीर केला होता. मात्र अजूनपर्यंत अनेक कर्मचाऱ्यांना भत्ता मिळालेला नाही, याबाबत ही आठवण करून दिली. कोरोनामुळं मृत्यू झालेल्या एसटीच्या ४३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लाखांचे विमा कवच तात्काळ देण्याची मागणी ही केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा