भारतीय रेल्वे नजीकच्या काळात देशभरात धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर वंदे मेट्रोची सेवा सुरू करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर केल्यानंतर रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांनी ही घोषणा केली.
वंदे मेट्रो, वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांची एक छोटी आवृत्ती, मोठ्या शहरांच्या आसपास राहणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून आणि त्यांच्या गावांमध्ये आरामात प्रवास करता यावा यासाठी रेल्वे विकसित करेल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
अर्थमंत्र्यांच्या भाषणात वंदे भारत गाड्यांचा उल्लेख आला नसला तरी त्याच्या मिनी व्हर्जनची घोषणा हे वैष्णव यांच्या अर्थसंकल्पोत्तर पत्रकार परिषदेचे वैशिष्ट्य होते.
‘Vande Metro’… soon #AmritKaalBudget pic.twitter.com/uY8kDcyxdR
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) February 1, 2023
"राज्याच्या जवळपासच्या भागातील प्रवाशांसाठी प्रवास सुलभ करण्यासाठी, PM मोदींच्या व्हिजन अंतर्गत पूर्णपणे भारतात तयार करण्यात आलेल्या वंदे मेट्रो ट्रेन लवकरच देशात सुरू केल्या जातील," असे मंत्री म्हणाले.
वंदे मेट्रो ट्रेन मोठ्या शहरांमध्ये धावणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. याशिवाय कमी अंतर असलेल्या दोन शहरांमध्येही चालवता येऊ शकते. वंदे मेट्रो ट्रेनच्या मदतीने प्रवासी लांबचे अंतर कमी वेळेत गाठू शकतील. इतकेच नाही तर लांबचे अंतर जसे की घर ते ऑफिस हे कमी वेळेत करणे शक्य होईल. त्यामुळे रहदारी कमी होण्यास मदत होईल आणि लोकांना ये-जा करणे सोपे होईल.
वंदे भारत मेट्रोची वैशिष्ट्ये
अश्विनी वैष्ण म्हणाले की, "आम्ही वंदे मेट्रो देखील विकसित करत आहोत. दुसऱ्या शहरातून ये-जा करणे यामुळे सोईस्कर होईल. त्यासाठी आम्ही येत वंदे भारत मेट्रो घेऊन येत आहोत. या वर्षी डिझाइन आणि उत्पादन पूर्ण होईल आणि पुढील आर्थिक वर्षात, ट्रेनच्या उत्पादनाचा रॅम्प-अप केला जाईल.
"एकप्रकारे हा प्रवाशांसाठी जलद शटलसारखा अनुभव असेल," असे वैष्णव म्हणाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या गाड्या आठ डब्यांच्या असतील आणि मेट्रो ट्रेनसारख्या असतील.
रेल्वे मंत्रालयाने चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) आणि लखनौस्थित रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन (RDSO) च्या महाव्यवस्थापकांना लवकरात लवकर आठ कारच्या वंदे भारत ट्रेनचे रेक बाहेर काढण्याचे निर्देश दिले आहेत.
एका वरिष्ठ रेल्वे अधिकार्याने सांगितले की, वंदे भारत मेट्रो विशेषत: व्यापारी, विद्यार्थी आणि विविध मोठ्या शहरांना भेट देऊ इच्छिणाऱ्या कामगार वर्गासाठी वरदान ठरेल.
हेही वाचा