Advertisement

माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवासही वातानुकूलित, सलून कोचची जोडणी

मिनि ट्रेनला वातानुकूलित एक विशेष सलून (आरामदायक डबा)डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवासही वातानुकूलित, सलून कोचची जोडणी
SHARES

नेरळ ते माथेरान मिनि ट्रेनचा प्रवासही आता वातानुकूलित होणार आहे. मिनि ट्रेनला वातानुकूलित एक विशेष सलून (आरामदायक डबा)डबा जोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हा वातानुकूलित डबा आठ आसनी असून नेरळ ते माथेरान आणि परतीच्या प्रवासासाठी त्याच दिवशी त्याचप्रमाणे पूर्वनोंदणी करून रात्रीच्या मुक्कामासाठी उपलब्ध असणार आहे.

नेरळ ते माथेरान सेवा

  • ट्रिप ए- नेरळहून सकाळी ०८.५० वाजता सुटेल आणि माथेरानला सकाळी ११.३० वाजता पोहोचेल.
  • ट्रिप बी-नेरळहून सकाळी १०.२५ वाजता सुटेल आणि माथेरानला दुपारी ०१.०५ वाजता पोहोचेल.

माथेरान ते नेरळ

  • ट्रिप सी- माथेरानमधून ०२.४५ वाजता सुटून नेरळला दुपारी ०४.३० वाजता पोहोचेल
  • ट्रिप डी- माथेरानमधून दुपारी ०४.०० सुटून नेरळला सायंकाळी ०६.४० वाजता पोहोचेल.

भाडे रचना

  • एकाच दिवशी राऊंड ट्रिपसाठी ३२ हजार ०८८ रुपये करांसहीत.
  • आठवड्याअखेरीस (वीकेंडला) ४४ हजार ६०८ रुपये करांसह
  • रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप: आठवड्यातील दिवशी ३२ हजार ०८८ रुपये करांसहीत आणि त्याव्यतिरिक्त दीड हजार रुपये प्रति तास
  • आठवड्याअखेरीस (वीकेंडला) रात्रभर मुक्कामासह राउंड ट्रिप प्रवासासाठी ४४ हजार ६०८ रुपये करांसह आणि अन्य शुल्कासह १,८०० रुपये प्रति तास आकारले जातील.

पर्यटक एकूण भाड्याच्या २० टक्के आगाऊ रक्कम भरून प्रवासाच्या तारखेच्या सात दिवस अगोदर १० हजार रुपये सुरक्षा ठेवीसह वातानुकूलित सलून बुक करू शकतात.

उर्वरित ८० टक्के प्रवासाच्या तारखेच्या ४८ तास अगोदर रक्कम भरावी लागेल, असे न केल्यास आगाऊ रक्कम आणि सुरक्षा ठेव जप्त केली जाईल आणि बुकिंग रद्द झाले असे मानले जाणार आहे. ४८ तासांच्या आत बुकिंग रद्द केल्यास कोणताही परतावा दिला जाणार नाही.



हेही वाचा

माथेरानचे सौंदर्य पहा व्हिस्टाडोम कोचमधून, डोंगर-दऱ्यांमधून धावणार ‘ब्लॅक ब्युटी’

मध्ये रेल्वेवरील माथेरान ठरले 2022 मधील राज्याचे आवडते पर्यटन स्थळ

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा