Advertisement

मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकिट दर जाणून घ्या

10 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता पंतप्रधानांनी झेंडा दाखवल्यावर उद्घाटनीय फेरी सीएसएमटी येथून शिर्डीसाठी आणि सोलापूरवरून मुंबईसाठी रवाना करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.

मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकिट दर जाणून घ्या
SHARES

पंतप्रधान मोदी फेब्रुवारीत मुंबई दौर्‍यावर येत आहेत. यावेळी ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर (सिद्धेश्वर मंदिर) या धर्मिक स्थळांना जोडणार्‍या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. 10 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता पंतप्रधानांनी झेंडा दाखवल्यावर उद्घाटनीय फेरी सीएसएमटी येथून शिर्डीसाठी आणि सोलापूरवरून मुंबईसाठी रवाना करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे.

मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस नियमितपणे सीएसएमटीहून सकाळी 6.15 ला रवाना होणार असून, शिर्डीत दुपारी 12.10 ला पोहोचेल. परतीचा प्रवास सायंकाळी 5.25ला सुरू होईल आणि मुंबईत रात्री 11.18ला संपेल. नव्या गाडीने पाच तास 55 मिनिटांत प्रवास पूर्ण होईल.

मंगळवार वगळता उर्वरित दिवस शिर्डी वंदे भारत धावेल. कसारा घाटातून ही गाडी धावणार आहे.

सोलापूर ते मुंबई

सोलापूर ते मुंबई हे अंतर रेल्वेने 455 किमी इतके आहे. एक्सप्रेस गाडीला या प्रवासासाठी साधारण साडे आठ तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस साडे सहा तासात हा प्रवास पूर्ण करण्याची शक्यता आहे.

थांबे : सोलापूर, (Solapur) कुर्डूवाडी, (Kurduwadi Junction) पुणे, (Pune) लोणावळा, (Lonavala) ठाणे, (Thane) दादर, (Dadar) हे थांबे या गाडीला असणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

तिकिटाची किंमत : चेअर कार साठी 900-1100 रुपये आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1900-2200 रुपये इतके शुल्क असण्याची शक्यता आहे. या शुल्कात प्रवाशांना आरामदायी प्रवाशासह नाश्ता, पाणी बॉटल देखील मिळण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

वंदे मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार, कमी असेल भाडे


साईनगर शिर्डी ते मुंबई

साईनगर शिर्डी ते मुंबई हे अंतर 385 किमी इतके आहे. एक्सप्रेस गाडीला हा प्रवास करण्यासाठी साधारण 6 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस साडे पाच तासात हे अंतर पूर्ण करेल.

थांबे : साईनगर शिर्डी, नाशिक, ठाणे, दादर, मुंबई हे या गाडीचे थांबे असण्याची शक्यता आहे.

तिकिटाची किंमत: चेअर कारसाठी 800 ते 1000 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1600 ते 1800 रुपये दर असण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

Union Budget 2023 : 'इलेक्ट्रिक वाहने' होणार स्वस्त? जाणून घ्या अर्थसंकल्पातील पुढचे पाऊल

Mumbai Local News: बोरिवली लोकल चालवतानाच मोटरमन झाला बेशुद्ध

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा