Advertisement

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना 'हा' पास देण्यास सुरुवात

काही नागरिक विनातिकीट आणि बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी एकात्मिक प्रवास पास (युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास) देण्याचा निर्णय घेतला आहे.

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना 'हा' पास देण्यास सुरुवात
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कडक निर्बंध लावले असून या निर्बंधांमुळे रेल्वे प्रशासनानं सर्वसामान्यांचा लोकल प्रवास बंद केला आहे. मात्र, लोकल प्रवासावर सामान्य प्रवाशांना बंदी आल्यानंतरही मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील प्रवासी संख्या ३५ लाखांवर गेली आहे.

काही नागरिक विनातिकीट आणि बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी एकात्मिक प्रवास पास (युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास) देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पास अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी शासनाने  https://epassmsdma.mahait.org ऑनलाइन लिंक सेवा उपलब्ध केली आहे.

पास देण्यास सुरुवात झाली असली तरीही त्याची मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अंमलबजावणीची तारीख राज्य सरकारकडून पश्चिम व मध्य रेल्वेला अद्याप कळवण्यात आलेली नाही. हे अधिकार पत्र असले तरच संबंधितांना तिकीट खिडकीवर पास किंवा तिकीट मिळणार आहे. सरकारी कर्मचारी, वैद्यकीय, पालिका कर्मचाऱ्यांना हा पास लागू असेल.

मागील वेळी जारी केलेला क्यूआर कोडआधारित ओळखपत्र पात्र होणार नाही. एकात्मिक प्रवास पाससाठी यावेळी पुन्हा नव्याने आस्थापनांना अर्ज करावा लागणार आहे. हा पास मिळवताना शासनाने उपलब्ध केलेल्या ऑनलाइन लिंकवर अत्यावश्यक सेवेतील परवानगी असलेल्या आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी लागणार आहे. त्यासाठी नोंदणी अर्जात नोंदणी क्रमांक, नोंदणी प्रमाणपत्र, त्या कर्मचाऱ्याचे तसे आस्थापनाचे नाव व पत्ता, आस्थापनात कोणती श्रेणी व पद यासारखी माहिती भरावी लागते. 

कर्मचाऱ्याचे नाव, त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक भरावा लागेल. त्यामुळे या कर्मचाऱ्याला भ्रमणध्वनीवर क्यूआर कोड ओळखपत्र पाठविले जाईल. अत्यावश्यक सेवेतील अन्य घटकांना ते कोणत्या स्तराच्या शहरात राहतात याच्या आधारे हे पास टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा