Advertisement

रेल्वेच जनरल तिकीट आता ऑनलाइन

रेल्वे प्रवाशांना आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या जनरल डब्याचं तिकीट बुकिंग ऑनलाईन म्हणजे यूटीएस अॅपद्वारे करता येणार आहे. ही सुविधा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता तिकीटीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही आहे.

रेल्वेच जनरल तिकीट आता ऑनलाइन
SHARES

दिवाळीला मुंबईच्या बाहेर फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करत असाल तर आणि ट्रेनच्या तिकीटाची चिंता सतावत असेल तर आता काळजी नको. कारण रेल्वे प्रवाशांना आता लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या जनरल डब्याचं तिकीट बुकिंग ऑनलाईन म्हणजे यूटीएस अॅपद्वारे करता येणार आहे.


सुविधा १ नोव्हेंबरपासून

ही सुविधा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता तिकीटीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज भासणार नाही आहे. मात्र या सुविधेमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना मोठ्या रांगेत उभं राहून तिकीट बुक करावं लागतं. मात्र, रेल्वे प्रशासनानं सुरू केलेल्या या सुविधेमुळे प्रवाशांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या तिकीटी ऑनलाईन बुक करता येणार आहे.


असं करा बुकिंग

या तिकीटवर प्रवाशांना पीएनआर नंबर दिला जाणार आहे. एका पीएनआर नंबरवर प्रवाशांना चार तिकीट बुक करता येणार आहे. तसंच, कोणत्या स्टेशनवरून चढायचं आणि कोणत्या स्टेशनवरून उतराचं अशा प्रकारचे जीपीएस संदेश तिकीट बुकिंग केल्यावर प्रवाशांना मिळणार आहेत.


हेही वाचा - 

धक्कादायक! गेल्या ५ वर्षांत रेल्वे ट्रॅकवर १८, ४२३ जणांचा बळी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा