मुंबई-मँचेस्टर विमानसेवा आता आठवड्यातून 5 दिवस


SHARE

जेट एअरवेजची मुंबई ते मॅंचेस्टरदरम्यान थेट विमानसेवा आता आठवड्यातून 5 दिवस सुरू होणार आहे. 5 नोव्हेंबरपासून ही सुरू होणार असल्याची घोषणा जेट एअरवेजने केली आहे. तसेच ही सेवा सुरू करणारी जेट एअरवेज ही देशातील पहिली विमान कंपनी असल्याचा दावा जेट एअरवेजने केला आहे. त्यानुसार गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या पाच दिवशी मँचेस्टरला जाण्यासाठी विमान मुंबईतून उड्डाण करणार आहे.


'ही' सेवा आवड्यातून पाच दिवस

254 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेलं ‘A330-200’ हे विमान या सेवेसाठी वापरण्यात येईल. ही विमानसेवा मे महिन्यातच सुरू करण्यात आली होती. मात्र आता ही सेवा आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय जेट एअरवेजने घेतला आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना पुढे अमेरिकेला किंवा इंग्लंडमध्ये इतर ठिकाणी जाण्यासाठी व्हर्जिन अॅटलांटिक, केएलएम रॉयल डच एअरलाईन्स, एअर फ्रान्स आणि अन्य सहयोगी विमान कंपन्यांची सेवा मिळवून देण्याची व्यवस्था करण्यासाठी जेटने या कंपन्यांशी करार केले आहेत.


वेळापत्रक

जेट एअरवेजची 9 डब्ल्यू 130 हे विमान मुंबईहून मध्यरात्री 2.30 वाजता उड्डाण करेल. तर मँचेस्टरच्या ‘टर्मिनल-2’ वर सकाळी 7 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी ‘9 डब्ल्यू 129’ हे विमान मँचेस्टरहून सकाळी साडेनऊ वाजता निघेल आणि मुंबईत ‘टर्मिनल-2’ वर रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

मुंबई-मँचेस्टर विमानसेवा आता आठवड्यातून 5 दिवस
00:00
00:00