Advertisement

जोगेश्वरीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 झाला एकेरी


जोगेश्वरीचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 झाला एकेरी
SHARES

हार्बर रेल्वेचे गोरेगावपर्यंत विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे जोगेश्वरी येथे हार्बरचा नवा मार्ग तयार होत असल्यामुळे जोगेश्वरी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 काढण्यात आला आहे. त्यामुळे जोगेश्वरीतही प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा एकेरी मार्ग झाला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील जोगेश्वरी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा बोरीवलीच्या दिशेने लोकल जाताना दोन्ही बाजूला होता. दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म असलेले एकमेव स्थानक  जोगेश्वरी होते. मात्र यापुढे प्रवाशांना एकाच बाजूने चढ उतार करावा लागणार आहे.

जोगेश्वरी स्थानकात सकाळ आणि संध्याकाळी मोठया संख्येने वर्दळ असते. त्यामुळे लोकल पकडताना जोगेश्वरी पूर्व आणि पश्चिमेकडील प्रवाशांना दोन्ही बाजूने सहज चढता उतरता येत होते. जोगेश्वरी पश्चिमेच्या प्रवाशांना सहज स्थानक गाठता येत होते, यापुढे या प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी प्लॅटफॉर्म 1 वर जाण्यासाठी पादचारी पुलाचे जिने चढावे लागणार आहेत. प्लॅटफॉर्म एक एकेरी झाल्यामुळे प्रवाशांची लोकल पकडताना यापुढे चांगलीच तारांबळ उडणार आहे. तसेच या स्थानकावर नव्याने प्लॅटफॉर्म 1 व 2 शेजारी आले आहेत. त्यात जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर केवळ दोनच पादचारी पूल आहेत. त्यात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 एकेरी झाल्यामुळे यापुढे या स्थानकावर प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा