Advertisement

मध्य रेल्वेवर तब्बल ३६ तासांचा मेगा ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर या रविवारी पुन्हा जम्बो मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेवर तब्बल ३६ तासांचा मेगा ब्लॉक
SHARES

मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर या रविवारी पुन्हा जम्बो मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मात्र हा ब्लॉक तब्बल ३६ तासांचा जम्बो मेगाब्लॉक असणार आहे. ठाणे ते दिवा या स्लो लाईनवर गाड्या उपलब्ध नसणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शुक्रवारी मध्य रेल्वेकडून अधिकृत परिपत्रक जारी केलं जाणार आहे. ठाणे स्टेशनजवळ जुन्या मार्गिका नवीन मार्गिकांना जोडण्याचं महत्वपूर्ण काम करण्यासाठी मेगाब्लॉक लावण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. 

येत्या रविवारी मध्य रेल्वेवर ३६ तासांचा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पाचव्या आणि सहव्या मार्गिकेच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान धिम्या लोकलची सेवा बंद राहणार आहे. दरम्यान, २ जानेवारी रोजीही रेल्वेकडून जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता.

२ जानेवारी रोजी रेल्वेकडून जम्बो ब्लॉक घेण्यात आला होता. ठाणे-दिवा मार्गावर २४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. रविवारी मध्यरात्री २ वाजल्यापासून ते सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता.

१ जानेवारीला रात्री ११:४३ पासून ते २ जानेवारीला रात्री ११:४३ पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.

या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवण्यात आल्या होत्या.

या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून २ जानेवारी रोजी ५:०५ पासून ते ३ जानेवारी मध्यरात्री १:१५ पर्यंत मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावणार असल्याचं समजतं. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली होती.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा