• उड्डाणपूल बंद, वाहतूक कोंडी सुरू
  • उड्डाणपूल बंद, वाहतूक कोंडी सुरू
SHARE

मुंबई - पश्चिम द्रुतगती मार्गावरील कलानगर उड्डाणपूल गुरुवारी रात्री उशिरा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. माहीम सी लिंकवरून अंधेरी बोरीवलीला जाण्यासाठी याच उड्डाणपुलाचा वापर करावा लागतो. असे असताना या उड्डाणपुलावरील उत्तर दिशेकडील मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आल्याने शुक्रवारी सकाळी कलानगर परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. गर्दीच्या वेळेस म्हणजेच सकाळी 8 नंतर वाहतूक कोंडीत वाढ होत गेली. पुढचे तीन दिवस म्हणजेच सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत पूल बंद राहणार असल्याने वाहनचालकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या