Advertisement

कोकणात जाणाऱ्या ट्रेनचे बुकिंग हाऊसफुल्ल


कोकणात जाणाऱ्या ट्रेनचे बुकिंग हाऊसफुल्ल
SHARES

गणपतीला रेल्वेने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दरवर्षी विषेश ट्रेन चालवण्यात येतात. पण कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल ट्रेनचे बुकिंग अवघ्या 12 ते 15 मिनिटांत हाऊसफुल्ल झाले आहे. सर्वच ट्रेनची वेटिंग लिस्ट आता 400 पर्यंत पोहचली आहे. यंदा गणेशोत्सव 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. रेल्वेच्या नियमानुसार 120 दिवस आधी आरक्षण प्रक्रिया सुरू झाली आहे. 

गणेशोत्सवाच्या काळातील आरक्षणे उपलब्ध होण्यास गुरुवार, 27 एप्रिलपासून सुरुवात झाली. कोकण रेल्वेची आरक्षण प्रक्रिया सुरू होताच अवघ्या 15 मिनिटांत सर्व गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना आता वेटिंग लिस्टचा आधार घ्यावा लागणार आहे. 24 ऑगस्टपासून धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, राज्यराणी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस या सर्व गाड्यांची वेटिंग लिस्ट 400 पर्यंत पोहचली आहे.

या प्रतिसादामुळे वेटिंग लिस्टही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे रिग्रेटचा संदेश मिळण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या डबलडेकर एसी एक्स्प्रेसलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून या गाडीची वेटिंग लिस्ट 300 पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे प्रवाशांना वेटिंगचा आधार घ्यावा लागणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा