Advertisement

गणेशोत्सवासाठी साप्ताहिक विशेष ट्रेन; वेळापत्रक जाहीर


गणेशोत्सवासाठी साप्ताहिक विशेष ट्रेन; वेळापत्रक जाहीर
SHARES

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळं ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस(एलटीटी) आणि करमाळी दरम्यान सुपरफास्ट साप्ताहिक एसी विशेष सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरुवार २ सप्टेंबर पासून ०१०१५ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री १२.५० वाजता सुटणार असून करमाळीला १२.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०१६ विशेष करमाळी एक्स्प्रेस येथून प्रत्येक २ सप्टेंबरपासून प्रत्येक गुरुवारी दुपारी १ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ या स्थानकावर थांबेल.

पूर्णपणे आरक्षित सुपरफास्ट वातानुकूलित विशेष ट्रेन क्रमांक ०१०१५ आणि ०१०१६ चे आरक्षण २२ ऑगस्टपासून संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा