Advertisement

काँक्रिटीकरणासाठी माहीमधील 'हा' रस्ता ५ दिवस बंद

सिमेंट-काँक्रिटचा वापर करत रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार आहे.

काँक्रिटीकरणासाठी माहीमधील 'हा' रस्ता ५ दिवस बंद
SHARES

मुंबईत मेट्रोच्या कामं मोठ्या प्रमाणात सुरू असून, या मेट्रोच्या कामासाठी ठिकठीकाणी खोदकाम करण्यात आलं आहे. या खोदकामामुळं वाहतूकदारांना पर्यायी रस्ता म्हणून लोखंडी पत्रे टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे. अशाच माहिम विभागात तयार करण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळं हा रस्ता नव्यानं बांधण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.

माहीम परिसरात असलेल्या या रस्तावर मेट्रोच्या कामामुळं खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं आहे. शिवाय पत्र्याच्या रस्ता असल्यानं अनेक ठिकाणी शिगा वर आल्या आहेत. त्यामुळं अपघाताची शक्यता अधिक असून वाहतूकदारांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागतो आहे. त्यामुळं या प्रवाशांची यातून सुटका करण्यासाठी नव्यानं हा रस्ता बांधण्यात येणार आहे.

सिमेंट-कॉंक्रीटचा वापर करत रस्त्याचं बांधकाम करण्यात येणार आहे. या बांधकामासाठी वांद्र्याहून दादरच्या दिशेनं जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. ९ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत हा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी बांधकामामुळं वाहतुककोंडी होऊ नये यासाठी वांद्रे येथून येणारी वाहतूक मोरी रोड ते सेनापती बापट मार्ग आणि एसवीएस रोड या मार्गावर वळविण्यात येणार आहे.

रस्ताच्या कामामुळं ५ दिवस वांद्रे ते दादर असा एकेरी रस्ता बंद असल्यानं अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा