Advertisement

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आणखी १५ तेजस्विनी


बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आणखी १५ तेजस्विनी
SHARES

लोकलप्रमाणं बेस्ट प्रशासनानं महिला प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तेजस्विनी या महिला स्पेशल बस सुरू केल्या. या बस महिला प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. बेस्टच्या ताफ्यात ३७ पैकी २२ बसगाड्या दाखल झाल्या आहेत. आता आणखी १५ बस येत्या १० दिवसांत येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

संख्या लक्षणीय

सध्याच्या तेजस्विनी बसगाड्यांना गर्दीच्या वेळेतच प्रतिसाद मिळत असल्याने या सेवेतून उत्पन्न मिळवणं बेस्टसमोर आव्हान आहे. बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. बसमध्ये महिला प्रवाशांसाठी राखीव आसनं आहेत. तर काही ठिकाणी महिला विशेष बसगाड्याही चालवण्यात येता. त्यांच्या दिवसाला ७० पेक्षा जास्त फेऱ्या होतात. तरीही गर्दीच्या वेळी महिला प्रवाशांना प्रवास करताना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेंतर्गत बेस्ट उपक्रमाने विनावातानुकूलित ३७ मिडी बसगाड्या दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.

महिला प्रवासी

सकाळी व संध्याकाळी गर्दीची वेळ सोडल्यास या बस सेवा सामान्य बससारख्याच चालवल्या जातात. कमी गर्दीच्या वेळी तेजस्विनी बस गाड्यांत महिला प्रवासी नसल्यानं उत्पन्नवाढीसाठी पुरुष प्रवाशांनाही प्रवेश दिला जातो. मात्र, या बस केवळ महिलांसाठीच चालवण्यात याव्यात, अशी मागणी केली जाते. कमी गर्दीच्या वेळेत ५ ते ७ महिला प्रवासी तेजस्विनी बसगाड्यांत असल्यानं पुरुष प्रवाशांना प्रवेश न देणे योग्य नाही.

कमी प्रतिसाद

उत्पन्नाच्या दृष्टीनं पाहता बेस्टला नुकसानीला सामोरं जावं लागतं. परंतु, महिला प्रवाशांचा मिळणारा कमी प्रतिसादामुळं बेस्ट उपक्रम या सेवांचा फेरआढावा घेण्याचा विचार करत आहे. येत्या १० दिवसांत आणखी १५ बसगाड्या सेवेत येणार असल्यानं त्यांचं नियोजनही करण्यासाठी बेस्ट समोर आव्हान असणार आहे.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा