Advertisement

सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर तोडगा निघण्याची शक्यता


सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर तोडगा निघण्याची शक्यता
SHARES

कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळं सर्वसामान्यांसाठी तब्बल १० महिने बंद असलेली मुंबई लोकलसेवा फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा सुरु झाली. मात्र, सर्वसामान्यांसाठी वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळं सर्वसामान्य मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सर्वसामान्यांच्या या नाराजीनंतर बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकलच्या वेळेबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल खुली करण्याचा निर्णय घेतला मात्र, सर्वसामान्यांसाठी वेळेच बंधन घालण्यात आलं आहे. त्यानुसार, पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी ४ व रात्री ९ वाजल्यानंतर या वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे सुमारे ४७ लाख प्रवासी अद्याप लोकल प्रवासासाठी परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. 

सर्वसामान्यांच्या या समस्येवर तोडगाव काढण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करणार असून यावर चर्चाही होणार असल्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या सोयीच्या वेळेत लोकल उपलब्ध व्हावी यासाठी आमच्या विभागानं हा विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा