लाईफलाईन की 'डेड'लाईन ?

 Mumbai
लाईफलाईन की 'डेड'लाईन ?

मुंबई - मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल रेल्वे गेल्या काही महिन्यांपासून मृत्युवाहिनी ठरत चालली आहे. मुंबईत 6 फेब्रुवारीला दिवसभरात झालेल्या रेल्वेच्या विविध अपघातांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झालेत.

विशेष म्हणजे मध्य रेल्वेत मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ झाल्याचे अढळून आले आहे. मध्य रेल्वेतील दादर, कल्याण, डोंबिवली या स्थानकांवर सोमवारी 5 जणांचा मृत्यू झाला. तर पश्चिम रेल्वेत 7 जण आणि हार्बर मार्गावर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

  मृत्यू जखमी
म.रेल्वे 5 3
प.रेल्वे 3 7
हार्बर 2 2

 

Loading Comments