Advertisement

बेस्ट, एसटीच्या प्रवाशांना महाराष्ट्र बंदचा फटका

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथं शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता.

बेस्ट, एसटीच्या प्रवाशांना महाराष्ट्र बंदचा फटका
SHARES

उत्तर प्रदेशातील लखीमपूर इथं शेतकऱ्यांच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी सत्ताधारी शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसनं हा बंद पुकारला होता. मात्र, या महाराष्ट्र बंदचा बेस्ट व एसटीच्या प्रवाशांवर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे.

बेस्टच्या ११ बसगाड्याची तोडफोड झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली. या बंदचा राज्यातील एसटी सेवेवरही परिणाम झाला. संध्याकाळी ४ पर्यंत एसटीच्या राज्यातील ३५ टक्क्यांहून अधिक फेऱ्या रद्द झाल्या. काही भागांत एसटी फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला.

महाराष्ट्र बंदमुळं सोमवारी बेस्ट बस धावू न शकल्याने मुंबईकरांचे हाल झाले. रेल्वे स्थानक आणि कार्यालय गाठण्यासाठी करावी लागणारी पायपीट असेच काहीचे चित्र मुंबईत होते. संध्याकाळी ४ वाजता हळूहळू बेस्ट बसेस रस्त्यावर धावू लागल्यानंतर मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.

बेस्ट कामगार सेनेने बंदमध्ये सामील होऊन कामगारांना कर्तव्यावर न येण्याचे आदेश दिले. त्यामुळं कर्तव्यावर येऊनही कर्मचारी प्रत्यक्षात मात्र सेवेसाठी बाहेर पडलेच नाहीत. सोमवापर्यंत एकूण ११ बसेसची तोडफोड धारावी, शिवाजी नगर, मानखुर्द यासह मुंबईतील काही भागांत झाली. त्यामुळे पोलिसांच्या संरक्षणात आणि त्यांच्या सूचनेनंतरच बसेस चालवण्यात येतील, असं बेस्ट उपक्रमानं स्पष्ट केलं.

एसटी महामंडळानं दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी ४ वाजेपर्यंत राज्यात १८ हजार ९४७ एसटी फे ऱ्यांपैकी २ हजार ८८५ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. सर्वाधिक रद्द फेऱ्या या लातूर, बुलढाणा, सोलापूर, परभणी, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूरसह अन्य विभागांतील आहेत. मुंबई महानगरातील एसटी सेवांवरही काहीसा परिणाम झाला.

मुंबई आगारातून धावणाऱ्या ८, पालघर विभागांतर्गत येणाऱ्या विविध आगारांतून सुटणाऱ्या १२८ आणि ठाणे विभागांतील विविध आगारांतील १९७ हून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा