Advertisement

महाराष्ट्र बंदचा बेस्टला फटका, पावणेदोन कोटींचे नुकसान


महाराष्ट्र बंदचा बेस्टला फटका, पावणेदोन कोटींचे नुकसान
SHARES

भीमा कोरेगाव हिंसाचारामुळे पुकारण्यात अालेल्या महाराष्ट्र बंदला मुंबईसह राज्यभर हिंसक वळण लागले. मुंबईत अनेक बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात अाली. अनेक बेस्टवर दगडफेक करण्यात अाल्याने बेस्ट चालकही जखमी झाले होते. मंगळवारी अाणि बुधवारी झालेल्या हिसंक अांदोलनामुळे बेस्टला मोठा फटका बसला असून २६३ बसेसची तोडफोड झाल्यामुळे बेस्टचे अंदाजे २० लाख ५१ हजार रुपयांचे नुकसान झाले अाहे. तसेच १ कोटी ८७ लाख रुपयांचा महसूल बुडाला अाहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात अाली.


बेस्टची परिस्थिती अधिकच ढासळली

सध्या बेस्टला अार्थिक चणचण भासत असून उत्पन्न वाढीसाठी बेस्टकडून नवनवीन प्रयत्न केले जात अाहेत. मात्र दोन दिवस झालेल्या अांदोलनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसला अाहे. एकीकडे नवीन बस खरेदी करण्याची क्षमता नसतानाच अाता २६३ बसेसची तोडफोड झाल्याने या बसेस अाता रस्त्यावर येण्यासाठी बरेच दिवस लागणार अाहेत. त्यामुळे या बसमधून मिळणारे उत्पन्नही थांबणार अाहे. त्यामुळे बेस्टची परिस्थिती अाणखीनच ढासळत जाणार अाहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा