Advertisement

किंग्ज सर्कल स्टेशनचा कायापालट


किंग्ज सर्कल स्टेशनचा कायापालट
SHARES

किंग्ज सर्कल - हार्बर रेल्वेमार्गावरील किंग्ज सर्कल स्टेशनचा कायापालट करण्यात आला आहे. या स्टेशनचं सुशोभीकरण करण्यात आलंय. या स्टेशनवर चित्रांतून सामाजिक संदेश देण्यात आले आहेत. डायहार्ड इंडियन या संस्थेच्या वतीनं हे सुशोभीकरण करण्यात आलं. प्राण्यांना वाचवा, तसंच मुक्या प्राण्यांचं शोषण करू नका, भारतीय संस्कृती जपा, असे विविध संदेश या चित्रांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
गेल्या तीन आठवड्यांपासून दर रविवारी या संस्थेसोबतच एसआयईएस महाविद्यालयाच्या विद्यार्थांनीही या सुशोभीकरणात हातभार लावला. तर, चित्रांच्या माध्यमातून जबाबदारी आणि मुक्या प्राण्यांबद्दलची आवड निर्माण होईल. याच उद्देशातून हे सुशोभीकरण करण्यात आलं, असं 'हॉल्ट' स्टॉप अॅनिमल अब्युझ या संस्थेचे संस्थापक गुरप्रित सिंग चावला यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा