Advertisement

दादर स्थानकावर व्हेडिंग मशीनमधून मिळणार मास्क, सॅनिटायझर

कोरोनाच्या या संकट काळात ग्लोव्ह्ज, मास्क आणि सॅनिटायझर हे अत्यावश्यक झालं आहे. त्यामुळे मुंबईतल्या रेल्वे स्थानकावर आता ग्लोव्ह्ज, मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध होणार आहे.

दादर स्थानकावर व्हेडिंग मशीनमधून मिळणार मास्क, सॅनिटायझर
SHARES

कोरोनाच्या या संकट काळात ग्लोव्ह्ज, मास्क आणि सॅनिटायझर हे अत्यावश्यक झालं आहे.  त्यामुळे  मुंबईतल्या रेल्वे स्थानकावर आता ग्लोव्ह्ज, मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध होणार आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वेंडिंग मशिन बसवण्यात येणार आहे. या मशिनमधून प्रवाशांना मास्क आणि सॅनिटायझर मिळणार आहे.


दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हे मास्क आणि सॅनिटायझर वेंडिंग मशीन बसवण्यात आलं आहे.  इतर वेंडिंग मशीनप्रमाणेच हे मशीनही काम करतं. मशीनमध्ये पैसे टाका आणि तुम्हाला हव्या असलेल्या वस्तूचा कोड टाकून ती वस्तू मिळवा. या मशीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. एकदाच वापरता येणाऱ्या मास्कपासून ते एन ९५ मास्कपर्यंत सर्व मास्क उपलब्ध होतील. याशिवाय ५० ते १०० रुपयांमध्ये हँड सॅनिटायझरही मिळेल आणि ज्यांना ग्लोव्हज हवेत त्यांना ग्लोव्ह्जही मिळतील.


मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनवर हे वेंडिंग मशीन लावण्यात आलं आहे. लवकरच इतर स्टेशनवरही अशा वेंडिंग मशीन ठेवल्या जाणार आहेत. 



हेही वाचा -

राज्यात ९८९५ कोरोना रुग्णांची दिवसभरात नोंद, पाहा तुमच्या भागातील रुग्णांची संख्या किती

मुंबईत कोरोनाचे १२५७ नवे रुग्ण, ५५ जणांचा दिवसभरात मृत्यू




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा