Advertisement

रेल्वे स्थानकातही मिळणार मास्क, सनिटायजर


रेल्वे स्थानकातही मिळणार मास्क, सनिटायजर
SHARES

मुंबईसह देशभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसवर अद्याप लस आली नाही. मात्र, कोरोनापासून स्वत:च्या बचावासाठी मास्क व सनिटायजरचा वापर करणे बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळं सध्या दुकानं, मॉल अशा अनेक ठिकाणी मास्क, हॅण्ड ग्लोव्हज आणि सनिटायजरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार, आता रेल्वे स्थानकतही मास्क व सनिटायजरची व्यवस्था करण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत संपूर्ण भारतात जवळपास २३० प्रवासी ट्रेन व ७०० उपनगरीय ट्रेन मुंबईत २ मार्गावर धावत आहेत. त्यामुळं या प्रवशांच्या सुरक्षेसाठी आता स्थानकातील स्टॉलवर कोरोनापासून सुरक्षा देणाऱ्या सर्व वस्तु मिळणार आहेत. तसंच या वस्तु बाजारी भावातच विकण्यात येणार आहेत.

रेल्वे स्थानकातील स्टॉलवर लवकरच या वस्तु उपलब्ध करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स, कुर्ला अशा स्थानकातील स्टॉलवर उपलब्ध होणार आहे. तसंच, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वेच्या स्थानकात अशाप्रकारचे स्टॉल सध्या सुरु आहेत.

राज्यात गेल्या चार दिवसापांसून दररोज ३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने केवळ चार दिवसात १५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज ३५२२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख १५ हजार २६२ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.३७ टक्के एवढे आहे.

सोमवारी कोरोनाच्या ५३६८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ८७ हजार ६८१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ११ लाख  ३५ हजार ४४७ नमुन्यांपैकी २ लाख ११ ९८७ नमुने पॉझिटिव्ह (१८.६७ टक्के) आले आहेत.

राज्यात ६ लाख १५ हजार  २६५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ३५५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ टक्के एवढा आहे.



हेही वाचा -

Hotel & Restaurant: राज्यात ८ जुलैपासून हाॅटेल-लाॅज उघणार, रेस्टाॅरंटबाबत निर्णय प्रलंबित

डोमिसाईल असेल तरच नोकरीची संधी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा