Advertisement

हार्बर रेल्वे मार्गावर ४८ तासांचा मेगाब्लॉक


हार्बर रेल्वे मार्गावर ४८ तासांचा मेगाब्लॉक
SHARES

बेलापूरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील कामासाठी हार्बर रेल्वेवर ४८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील‌ तब्बल ३४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

बुधवारी रात्री या मेगाब्लॉकला सुरुवात होणार आहे. २७ डिसेंबरच्या (बुधवार-गुरुवार) मध्यरात्री २ वाजल्यापासून ते २८ डिसेंबर (गुरुवार-शुक्रवार) मध्यरात्री २ वाजेपर्यंत असा ४८ तासांचा मेगाब्लॉक असणार आहे.



३४ फेऱ्या केल्या रद्द -

पनवेल-१८, नेरुळ-४, वाशी-१० आणि मानखुर्द-२ फेऱ्यांचा समावेश आहे. ब्लॉकच्या दोन्ही दिवसांत या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, या ब्लॉकचा ट्रान्सहार्बर मार्गावर परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.


यापूर्वीचा मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर २२ ते २५ डिसेंबर असा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्या ब्लॉकच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजेच मंगळवारी बेलापूर स्थानकात तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल झाले होते. तब्बल ५ तासानंतर हार्बर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली होती. दरम्यान, मंगळवारच्या बिघाडामुळे हार्बर मार्गावरील १४ लोकल फेऱ्या पूर्णत: आणि १६ लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आलं. तसंच, जवळपास १०० लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा