Advertisement

रविवार ठरणार मुंबईकरांसाठी 'ब्लॉक'वार


रविवार ठरणार मुंबईकरांसाठी 'ब्लॉक'वार
SHARES

मुबंई - रेल्वे मार्गावरील रूळ दुरुस्ती आणि तांत्रिकी कामासाठी रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशी मेगा ब्लॉग असल्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागणार आहेत. एकाच दिवशी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक तर आहेच. शिवाय पश्चिम रेल्वेवरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम मार्गावर रविवारी 5 फेब्रुवारीला जम्बोब्लॉक घेतला जाणार आहे. यादरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान, अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत दुरूस्ती आणि तांत्रिक काम सुरू राहील. त्यामुळे या वेळेत चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर काही अप आणि डाऊन फास्ट लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बर मार्गावरील नेरुळ ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते 4.10 वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम चालणार आहे. ब्लॉकदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत सीएसटी, पनवेल, बेलापूर, वाशी स्थानकादरम्यानी अप आणि डाऊन सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यावेळी हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेन लाईन आणि ट्रान्सहार्बर मार्गाने प्रवास करू शकतील.

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान डाऊन मार्गावर सकाळी 10.15 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या वेळेत मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान डाउन जलद मार्गावरील वाहतूक सकाळी 9.38 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत डाउन धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. परिणामी डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्या 20 मिनिटे उशिराने धावतील. तसेच ठाण्याच्या पुढे जाणाऱ्या रेल्वेच्या सर्व जलद मार्गावरील सेवा पुन्हा मुलुंडपासून डाउन जलद मार्गावर चालवण्यात येतील. सकाळी 10.45 ते दुपारी 3.18 वाजेपर्यंत ठाण्यावरून सुटणारी अप जलद मार्गावरील लोकल जलद किंवा सेमी जलद मार्गावरील मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवर थांबणार असून या लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा